Dr Sunital Lalwani

Abnormal uterine hemorrhage (AUB) योनिगत रक्तस्त्रावाबद्दलची माहिती (गर्भाशय व योनिमार्गातून होणारा रक्तस्त्राव)

Abnormal uterine hemorrhage (AUB) योनिगत रक्तस्त्रावाबद्दलची माहिती (गर्भाशय व योनिमार्गातून होणारा रक्तस्त्राव)

Dr Sunita Lalwani, Gynecologists’

  • गर्भाशय व योनिमार्गातून होणारा अति रक्तस्त्राव हा नेहमी होणाऱ्या पाळीच्या रक्तस्त्रावापेक्षा वेगळा असतो.
  • हा रक्तस्त्राव जननक्षम वयात (पाळी सुरु झाल्यापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत) किंवा रजोनिवृत्तीनंतर सुद्धा होऊ शकतो.
  • या रक्तस्त्रावाची मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे दिसू शकतात. पाळी सुरु असतांना प्रभूत योनिगत रक्तस्त्राव होणे किंवा जास्त दिवस रक्तस्त्राव होणे, पाळी लवकर लवकर येणे (एकवीस दिवसांच्या आत), पाळी लवकर येणे व जास्त रक्तस्त्राव या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणे, अनियमित रक्तस्त्राव होणे, संबंधाच्या वेळी रक्तस्त्राव होणे इत्यादि.
  • या रक्तस्त्रावाची कारणे म्हणजे, गर्भाशयातील मांसाच्या गाठी, गर्भाशय व शेजारील अवयवांना सूज येणे, गर्भाशयाच्या अस्तराला सूज येणे, गर्भाशयाचा टीबी, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशयातील कोंब, गर्भाशय ग्रीवेला येणारी सूज किंवा कोंब, गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग, गर्भाशयात बसवलेली गर्भनिरोधक साधने (तांबी), योनिमार्ग किंवा गर्भाशयास इजा होणे, अंडाशयातील गाठी, थायरॉइड ग्रंथीचे विकार, गर्भनिरोधक गोळ्या अनियमितपणे घेणे अशी असतात.
  • गर्भाशय व योनिमार्गातून होणाऱ्या या रक्तस्त्रावासाठी विविध प्रकारची निदान साधने व उपचारपद्धती उपलब्ध आहेत. उपचार हे सामान्यत: रक्तस्रावाच्या कारणावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, औषधोपचार (गोळ्या/इंजेक्शन्स), गर्भाशय साफ़ करुन आतले अस्तर तपासणीसाठी पाठवणे, गर्भाशय ग्रीवेची दुर्बिणीतून तपासणी करुन तुकडा तपासणे, गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया (पोटातून, योनिमार्गातून किंवा दुर्बिणीतून), गर्भाशयाची दुर्बिणीतून तपासणी, गर्भाशयात औषध सोडणारी यंत्रणा (मिरेना) इ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *